वर्गाबाहेर काढलं म्हणून विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार

November 6, 2016 11:29 AM0 commentsViews:

panjab34पंजाब, 06 नोव्हेंबर : गणवेश घातला नाही म्हणून ओरडल्याबद्दल नववीत शिकणा-या एका विद्यार्थ्याने शिक्षकाला वर्गात येऊन गोळ्या घातल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडलीय. या घटनेत शिक्षक गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर कामरान या विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे.

मध्य प्रदेशमधील रतलाम शहरातील एका शाळेत सकाळी साडे आठ वाजता वर्ग सुरू झाल्यानंतर कामरान शाळेचा गणवेश घालून आलेला नसल्याने शिक्षकांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. यावेळी या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर शिक्षकांनी कामरानला वर्गातून बाहेर काढलं. अवघ्या दहा मिनिटांत कामरान शाळेत परतला आणि गावठी कट्‌ट्यातून त्याने शिक्षकाला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे रतलाम शहरात एकच खळबळ उडालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close