अनुष्कासोबत ‘विराट’ बर्थडे पार्टी

November 6, 2016 11:54 AM0 commentsViews:

06 नोव्हेंबर : भारतीय टीमचा तडाखेबाज फलंदाज आणि वृद्धांपासून ते तरुणामध्ये लोकप्रिय असलेला विराट कोहलीचा काल अठ्ठावीसावा वाढदिवस होता. त्याच्या या वाढदिवसाची राजकोटमध्ये शानदार पार्टी पार पडली.

न्युझीलंड मालिका संपल्यामुळे तो सध्या त्याच्या एफसी गोवा या फुटबॉल टीमला चिअर करण्यासाठी त्यांच्या सामन्यांना हजेरी लावतोय. कधी नव्हे तो यावर्षी त्याच्या वाढदिवसाला तो फारसा व्यस्त नव्हता त्यामुळेच राजकोटमध्ये शाही पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माही त्याच्यासोबत होती. अनुष्काला घेण्यासाठी स्वत: विराट एअरपोर्टवर गेला होता. ही पार्टीसुद्धा तिनेच अरेंज केल्याचं समजतं. या पार्टीला टीम इंडियाचे खेळाडूही त्यांच्यासोबत होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close