उपमुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात पाणीटंचाई

April 29, 2010 5:23 PM0 commentsViews: 5

29 एप्रिल

उपमुख्यमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पाणी टंचाईने वैतागलेल्या राजापूरच्या संतप्त गावकर्‍यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला आज टाळे ठोकले. या गावासाठी 44 लाखाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. पण ग्रामपंचायत पाईपलाईन ऐवजी पाण्याच्या टाकीचे काम करत असल्याची लोकांची तक्रार आहे.

जोपर्यंत गावचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे टाळे काढणार नसल्याचा गावकर्‍यांचा निर्धार आहे.

सध्या या गावातल्या महिलांना पायी वणवण करून बोअरचे पाणी आणावे लागत. तेही पाणी दूषित असल्याची या गावकर्‍यांची तक्रार आहे.

close