औरंगाबाद अग्नितांडव प्रकरणी फटाका असोसिएशनवर गुन्हा दाखल

November 6, 2016 3:15 PM0 commentsViews:

ayrangabad_fataka_fire (5)06 नोव्हेंबर : औरंगाबादेत फटाका स्टॉल जळीत प्रकरणी फटाका असोसिएशनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग प्रतीबंध आणि सुरक्षा कायदा, स्फोटके कायदा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील औरंगपुरा भागातील जिल्हा परिषद मैदानावर 29 ऑक्टोबर रोजी फटाक मार्केटला भीषण आग लागली होती. या आगीत फटाक मार्केट बेचिराख झालं होतं. या आगीत तब्बल 142 दुकानं भक्षस्थानी पडली होती. या प्रकरणी आता फटाका असोसिएशनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नियम पायदळी तुडवल्याने 142 स्टॉल आगीत खाक झाले होते. आग प्रतीबंध आणि सुरक्षा कायदा, स्फोटके कायदा नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी विलास खंडेलवाल आणि फटाका विक्रेता संघटनेचे इतर पदाधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close