वाडामधल्या कंपनीला भीषण आग, करोडोंची मालमत्ता खाक

November 6, 2016 2:19 PM0 commentsViews:

wada_fire

06 नोव्हेंबर: पालघर जिल्ह्यातल्या वाडा रोडवरच्या कुडूस गावाजवळ डोढिया सिंथेटिक्स या कंपनीला काल रात्री आग लागली. रात्री 2 वाजता ही भीषण आग लागली. यात करोडो रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीय.

डोढिया सिंथेटिक्स कंपनीत धागा बनवला जातो. त्यामुळेच आगीनं पेट घेतला. आग विझवण्यासाठी 15 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ठाणे,कल्याण, वसई,विरार,भिवंडी इथून अग्निशामक दलाच्या गाड्या पोचल्या होत्या.

आता आग विझली आहे. वाडा पोलीस निरीक्षक आणि वाडा तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close