एकविरा देवीच्या पायथा मंदिरात चोरी, साडेसहा लाखांचा ऐवज चोरीला

November 7, 2016 9:31 AM0 commentsViews:

ekvira devi131

07 नोव्हेंबर : एकवीरा देवीच्या कार्ला गडाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात मंदिरात रविवारी रात्री चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी दरवाज्यांचे कुलुप तोडत मंदिरातील दोन पैशांनी भरलेल्या दानपेट्या, देवीचा चांदीचा मुकुट आणि कानातील सुर्वणफुले असा अंदाजे 6 ते 7.30 लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे.

एकवीरा देवी ही राज्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. हजारो भाविक देवीच्या दर्शनाला येतात. शिवाय ते हजारोंचं दानही करतात. काल (शनिवारी) मंदिरातील मुकुट नियमित जागेत ठेवला नसल्याची माहिती चोरट्यांना मिळाली. त्याचाच फायदा घेत, चोरट्यांनी मध्यरात्री मुकुट आणि दोन दानपेट्या चोरल्या.

सुदैवाने देवीच्या अंगावर फुलांचे हार असल्याने त्या हारांमधील सुमारे साडेअकरा तोळ्यांचा सोन्याचा हार चोरट्यांच्या नजरेत न आल्याने तो मात्र तसाच देवीच्या अंगावर राहिला.

दरम्यान, मंदिरातील आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने या चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close