पुण्यात सरावादरम्यान पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराने मृत्यू

November 7, 2016 1:17 PM0 commentsViews:

pune police12113

07 नोव्हेंबर : पुण्यातील हडपसरमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर आज सकाळी एका पोलीस कॉन्स्टेबलचा सरावादरम्यान अचानक कोसळून मृत्यू झाला. राम नागरे असं त्यांचं नाव असून हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

राम नागरे हे पोलीस नियंत्रण कक्षात सेवेत होते. सध्या पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा सुरू असून त्यात त्यांनी भाग घेतला होता.

दरम्यान, हडपसर इथल्या एसआरपीएफ मैदानावर आज शारीरिक चाचणीसाठी सराव सुरू असतानाच नागरे अचानक मैदानावर कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्याच नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close