मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे ‘बुरे दिन’ – राहुल गांधी

November 7, 2016 2:36 PM0 commentsViews:

rahul gandhi1231

07 नोव्हेंबर : नरेंद्र मोदींना सत्तेचं वेड लागलं असून त्यांच्याशी असहमत असलेल्यांची गळचेपी सुरू आहे. वृत्तवाहिन्या बंद पाडल्या जात  आहेत तर दुसरीकडे प्रश्न उपस्थित करणा-या विरोधकांनाही तुरुंगात डांबलं जात आहे. या मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे ‘बुरे दिन’ आल्याची घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय.

काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीला सोमवारी सुरुवात झाली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती अस्वास्थामुळे राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलीय. यावेळी बोलताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींसह भाजपवर टीकेवर झोड उठवली आहे.

आपल्या जवानांना वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीला विलंब आणि जखमी जवानांच्या पेन्शनमध्ये कपातीचं ‘बक्षीस’ दिलं जातय’ अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. तर राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सर्वसामान्यांना प्रश्न विचारण्यावर निर्बंध घातले जात आहेत, असा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला. प्रश्न विचारल्यास सरकार अस्वस्थ होतं, कारण त्यांच्याकडे प्रश्नांचं उत्तरच नाही.

संसदेच्या आगामी अधिवेशनात मोदी सरकारला उघडं पाडण्याचं आवाहनही यावेळी राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close