वाळूमाफियांकडून तरुणाची हत्या

April 30, 2010 10:04 AM0 commentsViews: 126

30 एप्रिल

पुणे जिल्ह्यात वाळू माफियांनी तरुणाची हत्या केली आहे. पुण्याजवळ शिरूरमध्ये हा प्रकार घडला.

यात शरद चौधरी या तरुणाला जीव गमवावा लागला आहे.

त्याच्यावर आनंदा रसाळ, विकास रसाळ, पिंट्या रसाळ आणि अनिल थोरात यांनी तलवारीने वार केले.

कुकडी नदीच्या पात्रातील वाळू उपशावरून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

तर अजून यात कोणालाही अटक झालेले नाही. रात्री कुकडी नदीच्या पात्रात हा प्रकार घडला.

close