मुंबईत अंधश्रद्धेचे दर्शन

April 30, 2010 10:41 AM0 commentsViews: 155

30 एप्रिल

अंधश्रद्धा काही फक्त ग्रामीण भागातच पहायला मिळतात, असे नाही. तर एकीकडे मेट्रो, मोनो आणि 3- G मोबाईलचे आगमन साजरे करणार्‍या मुंबईतही अंधश्रद्धा पाहायला मिळत आहेत.

ट्रॉम्बे चिता कॅम्प येथील मारिअम मातेच्या उत्सवात आपली इच्छा पूर्ण झालेले भक्त शरीरावर काटे रोवून नवस फेडत आहेत. यात लहान मुले, महिला हे धातूचे काटे टोचून घेताना दिसतात.

मारीमुत्तो मंदिर ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात येणारा मारीअम मातेचा उत्सव याही वर्षी दक्षिण भारतीय समजाच्या वतीने भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

मारिअम मातेच्या कृपेने महामारी नष्ट झाली, अशी पुराणकाळापासून भाविकांची श्रद्धा आहे. चैत्रपौर्णिमेच्या दिवशी उपासांची सांगता होते. आणि याच दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेले भक्त शरीरावर काटे रोवून नवस फेडतात.

close