शहीद राजेंद्र तुपारे यांच्यावर उद्या मुळगावी अंत्यसंस्कार

November 7, 2016 4:34 PM0 commentsViews:

rajendra_tupare

07 नोव्हेंबर : जम्मू- काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूर जवान राजेंद्र तुपारे शहीद झालेत. पुंछ भागात रात्री 2 च्या सुमारास पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात तुपारे शहीद झालेत. आज संध्याकाळपर्यंत तुपारे यांचं पार्थिव चंदगडमध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राजेंद्र तुपारे हे मूळचे चंदगड तालुक्यातल्या कारवे गावचे रहिवासी होते. लष्करातील 22 मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. त्यांची पोस्टिंग पुंछमध्ये होती. राजेंद्र शहीद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवे गावावर शोककळा पसरलीये.
जम्मूवरून त्यांचं पार्थिव दिल्ली एअरपोर्ट आणि दिल्लीवरून गोवा एअरपोर्ट आणि गोव्यावरून लष्करी वाहनान बेळगावमध्ये संध्याकाळी उशिरा पोहोचणार असं सांगण्यात आलंय. त्यानंतर बेळगाव मधील मराठा लाईट इंन्फट्रमध्ये त्याना मानवंदना देऊन साधारण उद्या सकाळी 11 वाजता मजरे कार्वे इथं अंत्यसंस्कारासाठी पार्थिव आणण्यात येणार आहेय येथिलच महात्मा फुले ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थानी तयारी सुरू केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close