कोपर्डी प्रकरण : ‘आरोपी नितीन भैलुमेला जामीन देऊ नये’

November 7, 2016 4:40 PM0 commentsViews:

kopardi4307 नोव्हेंबर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी नितीन भैलुमेच्या जामीन अर्जाला आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केलाय. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला नितीननं रस्त्यावर पेट्रोलिंग करुन मदत केली. त्यामुळे पीडितेवर बलात्कार आणि हत्या झाली. त्यामुळे भैलुमेला जामीन देऊ नये असा युक्तिवाद करण्यात आला.

त्याचबरोबर भैलुमेला जामीन दिल्यास साक्षीदार फोडण्याची शक्यता असल्याचंही निकम यांनी म्हटलंय. त्याचबरोबर नितीनचं घर जप्त केलं नाही आणि त्यास घरात प्रतिबंध केला नसल्याचं निकम यांनी सांगितलं. या संदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. भैलुमेला खटल्यातून वगळण्याचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच फेटाळलाय. त्या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी केलेल्या अपीलावरही उद्या म्हणणं मांडण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close