‘मरणानेही छळलं’, पत्नीवर अंत्यसंस्कारासाठी पतीने ढकलगाडीवर नेला मृतदेह

November 7, 2016 5:37 PM0 commentsViews:

hyderabad Beggar07 नोव्हेंबर : ‘जगण्याने छळले होते मरणाने केली सुटका’ पण मरणानंतर सुटका न होण्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना हैदराबादमध्ये घडलीये. मृत पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पतीला पैशाअभावी तब्बल 50 किलोमिटर पायपीट करावी लागली. पत्नीचा मृतदेह त्याने ढकलगाडीवरुन आपल्या गावी नेण्याचा प्रयत्न करावा लागला.

रामुलूंची पत्नी कविता ही हैदराबादमध्ये मरण पावली. दोघंही कुष्ठरोगी. त्यातच कविताचा मृत्यू झाला. पण तिच्या अंत्यसंस्कारासाठी रामुलूंकडे पैसे नव्हते. तिचं पार्थिवावर अंत्यसंस्कार मुळगावीच होणार होते. पण अँब्युलन्ससाठी लागणारे पाच हजार रूपये रामुलूंकडे नव्हते. शेवटी भीक मागून जगणा•या रामुलुंनी कविताचं पार्थिव एका हातानं ओढायच्या ढकलगाड्यावर टाकलं आणि प्रवास सुरू केला.

मैकोड हे रामुलुंचं मुळ गाव. हैदराबादपासून जवळपास सव्वाशे किलोमीटर. त्या गाड्यावर बायकोचं पार्थिव टाकून रामुलू 50 किलोमीटर चालले. विकाराबादमध्ये आल्यानंतर लोकांच्या नजरेस ही गोष्ट आली. त्यावेळेस सगळ्‌यांनी एकत्र येऊन कविताचं पार्थिव त्यांच्या गावी नेण्याची सोय केली. आणि रामुलूंसह कविताचीही शेवटच्या प्रवासातून सुटका झाली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close