अॅक्शन स्टंट जीवावर बेतला, दोन अभिनेत्यांचा बुडून मृत्यू

November 7, 2016 6:19 PM0 commentsViews:

kannada_hero07 नोव्हेंबर : चित्रपटातला ऍक्शन स्टंट करताना दोन अभिनेत्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकात घडलीये. कन्नड अभिनेते उदय आणि अनिल यांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय.

कर्नाटकातल्या रामनगर जिल्ह्यातल्या डॅममध्ये कन्नड सिनेमाचं शूटिंग सुरू होते. चित्रपटात ऍक्शन सिन शूट केला जात होता. यावेळी उदय आणि अनिल या दोन अभिनेत्यांनी हेलिकॉप्टरमधून पाण्यात उडी घेतली. हे दोघंही सुरुवातीला पोहत असल्यासारखे वाटले मात्र त्यानंतर ते दोघंही बेपत्ता झाले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झालाय. या प्रकरणी सिनेमाचा निर्माता एस. व्ही. राजेंद्रसिंग बाबू आणि ऍक्शन डायरेक्टर परवेझ शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close