राहुल गांधी अध्यक्ष व्हा, काँग्रेसमध्ये सूर !

November 7, 2016 8:17 PM0 commentsViews:

 99099sonia_rahul
07 नोव्हेंबर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाची अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोमवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सगळ्या नेत्यांनी एक सुरात राहुल ला अध्यक्ष करण्याची मागणी केली. राहुल गांधी सुद्धा अध्यक्ष व्हायला तयार असून जबाबदारी कधी घ्यायची हा निर्णय स्वतः राहुल गांधी घेणार आहेत.

दिल्लीत सोमवारी सोनिया गांधी आजारी असल्याने राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची कार्य समितीची बैठक पार पडली. फेब्रुवरीत होणा•या पाच राज्यांच्या निवडणुका आणि संघटनात्मक निवडणुका घेण्या संदर्भात चर्चा या बैठकीत होणार होती. पण या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ए के अँटोनी यांनी राहुल गांधींनी अध्यक्ष होण्याची मागणी केली, बैठकीत उपस्थित असलेल्या सगळ्याच नेत्यांनी या मागणीचे अनुमोदन केलं. राहुल गांधी यांनी देखील यावर स्वीकृती दर्शवाली आहे. काँग्रेस सूंत्रानी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी आणि राहुल गांधी मिळून अध्यक्षपद राहुलनी कधी स्विकारायचे याचा निर्णय घेतील.

सूत्रांच्या मते काँग्रेसमध्ये एक प्रवाह आहे ज्याला वाटतं की, राहुल गांधींनी अध्यक्ष होण्याची हीच योग्य वेळ आहे. फेब्रुवारीत उत्तरप्रदेशसह पाच प्रमुख राज्यात निवडणुका आहे. ज्यात काँग्रेसची परिस्थितीपणाला लागली आहे. अश्यात गेल्या काही दिवसात राहुल गांधी ज्या आक्रमक पद्धतीने सरकार विरोधात रस्त्यांवर उतरले आहे. यामुळे त्यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे. शिवाय सोनिया गांधी यांच्यावर प्रकृतीच्या कारणा मुळे मर्यादा आल्या आहेत. अश्यात राहुल अध्यक्ष म्हणून आक्रमक पणे सगळीकड़े फिरुन पक्षाचा प्रचार करू शकतील.

राहुल गांधी यांनी नुक्त्याच उत्तर प्रदेशात काढलेल्या परीवर्तन यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय पंजाबमध्ये सुद्धा काँग्रेस जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे,राहुल गांधी यांची मेहनत आता फळ देतेय असं काँग्रेस नेत्यांना वाटतंय.

अश्यात काँग्रेसकड़े या क्षणी गमावन्या लायक काहीच नाहीये. उलट राहुल गांधी अध्यक्ष झाल्याने तरुण कार्यकर्ते उत्साहात येतील आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राहुल गांधींकड़े टीम तयार करायला पुरेसा वेळ राहिल असं पक्षाला वाटतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close