ठाण्यातील तीन हात नाक्याला ‘मराठा क्रांती चौक’ नाव द्या !

November 7, 2016 9:39 PM0 commentsViews:

thane_tin_hat_naka07 नोव्हेंबर : ठाण्यातला हा मोर्चा ज्या तीन हात नाक्यावरून सुरू झाला तिथल्या चौकाला ‘मराठा क्रांती चौक’ असं नाव देण्यात यावं अशी मागणी या मोर्चाच्या आयोजकांनी केलीये. यासंबंधी ठाण्याचे महापौर संजय मोरे यांच्याकडे लेखी मागणी केली गेली असून या नामकरणाचा प्रस्ताव येणा-या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येईल असं आश्वासन महापौरांनी दिलंय

ठाणे जिल्ह्याच्यावतीने 16 आक्टोंबर 2016 रोजी मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मूकमोर्चा तीनहात नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला होता.मोर्चाला उत्स्फुर्त गर्दीने ठाणे शहरातील उच्चांक मोडला होता. मोर्चा यशस्वी झाल्यानंतर आयोजक यांनी तीनहात नाका येथील चौकाचे या अगोदर कधीही नामकरण झाले नसल्याची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला पत्र देऊन या चौकाचे मराठा क्रांती चौक असं नामकरण करण्याची मागणी केली होती. त्याचे स्मरण महापौर यांना करून देत त्यांनाही पत्र देऊन नामकरणाची मागणी केली.यावेळी महापौर यांनी नोव्हेंबर 2016 च्या महासभेत तसा प्रस्ताव आणण्याची हमी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close