समुद्री चाच्यांच्या तावडीतून अकबर सुटला

October 17, 2008 4:46 PM0 commentsViews: 3

17 ऑक्टोबर, रत्नागिरीसोमालीयाजवळ समुद्रात हायजॅक करण्यात आलेलं इरान डेनियात हे जहाज 10 ऑक्टोबरला मुक्त झालं.जहाजावर असलेल्या तीन भारतीयांपैकी अकबर जुवाले काल रत्नगिरीतल्या आपल्या कडवई गावातल्या घरी परतला. तब्बल 50 दिवस त्याने समुद्री चाच्यांच्या दहशतीखाली घालवले.रत्नागिरीतल्या आपल्या कडवईच्या घरी परतल्याच्या आनंदापुढं अकबरला क्षणभर विसर पडलाय की त्याचं जहाज तब्बल 50 दिवस सोमालियाजवळ समुद्रात हायजॅक करण्यात आलं होतं. हे 50 दिवस त्याने जीव मुठीत धरून काढले. अकबरचेआजोबाही 27 वर्षं शिपिंग कंपनीत होते. पूर्वीपासूनच सोमालीयाजवळ व्यापारी जहाजं हायजॅक होत असल्याचं ते सांगतात. अकबरच्या आईला तो घरी आलेला पाहून अश्रू आवरले नाहीत. या जहाजावरच्या चाच्यांनी आधी मोठी रक्कम मागितली होती. पण अकबरच्या कंपनीनं जहाज सोडवून घेण्यासाठी किती डॉलर दिले, ते त्यालाही माहीत नाही.

close