दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार, शहीद गलांडेंच्या पत्नीचा निर्धार

November 7, 2016 9:59 PM0 commentsViews:

07 नोव्हेंबर : उरी हल्यात शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या पत्नी निशा गलांडे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना सैन्यात पाठवण्याचा निर्धार केलाय. देशासाठी मी माझ्या मुलांना सीमेवर लढायला पाठवलं आणि नातवांनाही पाठवणार असल्याचं शहीद गलांडे यांच्या आईनेही सांगितलं.galande_wife

जम्मू काश्मीरमधील उरी इथं दहशतवाद्यांनी लष्काराच्या मुख्यालयावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. यात साता•याचे सुपूत्र चंद्रकांत गलांडे यांना वीरमरण आलं होतं. आज मुंबईत शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही दोघांनी मुलांना मोठं झाल्यावर त्यांना सैन्यात पाठवणार असं स्वप्न पाहिलं होतं. आज ते आमच्यात नाही पण त्यांचं स्वप्न मी नक्की पूर्ण करणार, दोन्ही मुलांना सैन्यात भरती करणार असा निर्धार चंद्रकांत गलांडे यांच्या पत्नी निशा गलांडेंनी बोलून दाखवला. तसंच माझ्या पाचही मुलांना सैनिक स्कूलमध्ये भरती केलं होतं. त्याचप्रमाणे नातवांनाही सैनिक स्कूलमध्ये भरती करणार आणि नातवांनाही मुलांना सैन्यात पाठवणार असल्याचं शहीद गलांडे यांच्या आईंनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close