जळगावातही गाड्या जाळल्या

April 30, 2010 11:23 AM0 commentsViews: 1

30 एप्रिल

नाशिक पाठोपाठ जळगावातही मध्यरात्री टू व्हिलर जाळण्याचा प्रकार झाला आहे.

शहरातील विसनजी नगर या भरवस्तीत ही घटना घडली. यात अज्ञात गुंडांनी पाच वाहने जाळली. जळगावच्या भर वस्तीत हा प्रकार घडला.

शहरातील अत्यंत शांत आणि सुरक्षित म्हणून विसनजी नगर परिसर ओळखला जातो. तेथे हा प्रकार कोणी आणि का केला त्याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

घराबाहेर लावलेल्या बाईकची पेट्रोलची नळी काढून आणि गाडीखाली कचरा गोळा करून ही आग लावण्यात आली.

close