आहे मनोहर तरी…दीपिकाच्या ड्रेसवर टीकेची झोड

November 8, 2016 11:38 AM0 commentsViews:

08 नोव्हेंबर: दीपिका पदुकोण आपल्या स्टाइल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. एमटीव्ही युरोप म्युझिक ॲवॉर्डसाठी दीपिका पोचली तेव्हा तिच्या ड्रेसकडे सगळ्यांच्याच नजरा वळल्या. पण तिच्या ड्रेसवर मात्र सगळीकडून टीकाच सुरू आहे.


या ॲवॉर्ड शोमध्ये पहिली एन्ट्री झाली ती दीपिकाची. हिरव्या रंगाचा ड्रेस दीपिकानं परिधान केला होता. याच ड्रेसला मीडियानं नाकं मुरडलीयत.

‘डेली मेल’च्या सर्व वेबसाइट्सवर दीपिकाचा ड्रेस सर्वात वाईट होता असं म्हटलं गेलंय. त्यांनी दीपिकाला ‘बॉलिवूड ब्लंडर’ म्हटलंय. ‘डेली मेल’मध्ये म्हटलंय, दीपिका सुंदर आहे. पण तिचं सौंदर्य निखरायला ड्रेस कमी पडलाय.त्याचा ताळमेळ जुळत नाही.’

‘डेली मेल’नं दीपिकाला एका रेस्टॉरंटमध्ये सर्बियन टेनिसपटूसोबत पाहिलं. पण तिला ओळखलं नसल्याचं म्हटलंय.

‘मिरर’नं म्हटलंय, दीपिका रेड कार्पेटवर आली, तेव्हा पडदा गुंडाळून आल्यासारखी वाटली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close