हैदराबाद स्फोटाचे मालेगाव कनेक्शन

April 30, 2010 11:39 AM0 commentsViews: 2

30 एप्रिल

हैदराबाद येथील बॉम्बस्फोटासंदर्भात अत्यंत खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या स्फोटात मालेगाव स्फोटातील आरोपींचा हात असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

आज नाशिक कोर्टात मालेगाव स्फोटाची सुनावणी होती.त्यावेळी हैदराबाद इथे 18 मे 2007 ला मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास करणारी सीबीआयची टीमही आली होती.

या टीमने हैदराबाद येथील स्फोटात साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आणि इतर सगळ्या आरोपींचे हात असल्याचा संशय असल्याचे कोर्टाला सांगितले.

या टीमने आम्हाला या आरोपींची चौकशी करू द्यावी, अशी विनंतीही कोर्टाला केली. तेव्हा कोर्टाने ती मान्य केली.

त्यानुसार 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान या आरोपींची नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये होणार आहे.

close