स्पेशल रिपोर्ट : डोंबिवलीकरांचं स्वच्छ शहराच्या दिशेने एक पाऊल

November 8, 2016 9:29 AM0 commentsViews:

सुवर्णा जोशी, डोंबिवली

08 नोव्हेंबर : एखादं चॉकलेट खाऊन त्याचं रॅपर तुम्ही तिथेच फेकून देता किंवा वेफर्स खाऊन त्याची पिशवी तुम्ही जिथे असता तिथे फेकून देता.घरातला कचर्‍याचा डबा इमारतीच्या बाजूच्या कोपर्‍यात टाकून मोकळे होता. मग ही सवय तूर्तास बदला आणि आपला परिसरच नाही तर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी खारीचा वाटा उचला.

डोंबिवलीतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवरचे हे कोपरे आता मोकळा श्वास घेऊ लागलेत. अनेक वर्ष या कोपर्‍यात कचर्‍याचं, दुर्गंधीचं आणि घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. इतकं की कचर्‍याचा ढीग अर्ध्या रस्त्यापर्यंत येत होता. पण आता इथं डोंबिवली वुमन्स वेलफेअर सोसायटीनं पुढाकार घेत छोटे बगीचे तयार केलेत. इतकंच नव्हे तर स्वच्छता आणि आरोग्य याचा संबंधही आजूबाजूला राहणार्‍यांना त्यांनी पटवून दिला आहे.

Dombivli21312

ऑगस्टपर्यंत रस्त्यांवरची परिस्थिती अत्यंत भयानक होती. कचर्‍याचं साम्राज्य इथं पसरलं होतं. आजूबाजूचे रहिवासीही इथेच कचरा आणून टाकत होते. पण डोंबिवली वुमन्स वेलफेअरच्या सदस्यांनी या रहिवाश्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याविषयी जनजागृती केली. आता हे रहिवासीही हे कोपरे स्वच्छ राहण्यासाठी हातभार लावतात.

शहराची स्वच्छता ही अशा संस्था आणि नागरिकांसोबत महापालिकेच्या मदतीशिवाय अशक्यच. एका बाजूला मोदी राष्ट्रीय पातळीवर स्वच्छता अभियान राबवत असताना त्यात जर प्रत्येकाचा सहभाग असेल तर देशच नव्हे तर राज्य, शहर, गाव आणि आपला परिसर स्वच्छ होणं सहज शक्य आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close