रणवीरसोबत सारा सैफ अली खानची बॉलिवूड एन्ट्री

November 8, 2016 2:51 PM0 commentsViews:

SARA

08 नोव्हेंबर: सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी साराच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा नेहमीच सुरू असते.अनेक अंदाजही बांधले जातायत. पण आता बातमी अशी आलीय की, साराची बॉलिवूड एंट्री होणारेय रणवीर सिंगसोबत.

सिनेमाचं नाव आहे ‘गली बॉय’.या सिनेमात रणवीर सिंगसोबत सारा दिसण्याची शक्यता आहे. सिनेमात मुंबईच्या चाळीतून दोन रॅपर्स पुढे येतात. रॅप साँगमध्ये करियर करतात.रणवीर सिंग रॅपरच्या भूमिकेत असेल.

सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तर करणारेय. तिनं सिनेमाची तयारीही सुरू केलीय. सारा खानच्या पदार्पणाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close