बदामाचे गुणकारी फायदे

November 8, 2016 5:01 PM0 commentsViews:

08 नोल्हेंबर: थंडीची चाहूल लागलीय. आणि थंडीत पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर द्यायचा असतो.थंडीत आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बदाम खाल्ले जातात. बदामानं शरीर आणि मन निरोगी राहतं.बदामाला सुक्या मेव्याचा राजा म्हटलं जातं.बदाम कडू आणि गोड प्रकारचे असतात. गोड बदाम खाल्ले जातात.
बदामात लोह,तांबे,फॉस्फरस आणि जीवनसत्त्व असतात.

1.बदाम खाल्ल्यानं उत्साह वाढतो. मेंदू,मज्जातंतू,हाडे,हृदय आणि यकृत यांचं कार्य सुरळीत चालतं. हाडे मजबूत होतात.

2. बदाम खाल्ल्यानं अशक्तपणा कमी होतो.

3. जुनाट मलावरोधावर बदाम सारक आहे. झोपताना 11 ते 15 बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होतं.

4. बदामाचं दूध सर्वात पौष्टिक मानलं जातं. ते पचायलाही हलकं असतं.

5. बदाम सौंदर्यवर्धक आहे.बदामाची पेस्ट,दुधाची साय आणि गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून चेहऱ्याला लावल्या तर चेहरा तेजस्वी होतो. त्वचा मुलायम होते.

6. बदामाचं तेल आणि एक चमचा आवळ्याचा रस केसांच्या मुळाशी चोळल्यास केस गळणं कमी होतं. केसात कोंडा झाला असेल तर हे तेल उपयोगी पडते.

7. बदामाची पूड पाण्यात घालून घेतली तर कफापासून आराम मिळतो. घसा खवखवत असेल तर बदामाची पूड फायदेशीर.

बदाम पाण्यात भिजत घालूनच खावेत.ते सोलून खावेत. शक्यतो सकाळी बदाम खाल्ले तर आरोग्याला गुणकारी असतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close