आयजी विठ्ठल जाधव धमकीप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

November 8, 2016 4:38 PM0 commentsViews:

CMsadas08 नोव्हेंबर : अमरावती विभागाचे आयजी विठ्ठल जाधव यांच्या आत्महत्येच्या धमकीप्रकरणी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुख्यमंत्री तसंच गृहसचिवांची भेट घेतलीय. ह्या प्रकरणात गृहसचिवांनी तातडीनं चौकशी अहवाल मागवलाय.

आपण मराठा असल्यामुळे डीजी सतीश माथूर हे छळ करत असल्याची तक्रार आयजी विठ्ठल जाधव यांनी केलीय. तसा व्हॉटस् अप मेसेज त्यांनीच व्हायरल केल्याचंही समजतंय. पोलीस दलातल्या एका वरिष्ठ आयपीएस अधिका•यानं राज्याच्या पोलीस प्रमुखांवरच असा जातीवाचक गंभीर आरोप केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही लक्ष घालावं लागलंय. त्यामुळेच चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close