शेतकर्‍यांना 50 हजार रुपये बिनव्याजी कर्ज

April 30, 2010 1:50 PM0 commentsViews: 2

30 एप्रिल

उद्या साजरा होणार्‍या महाराष्ट्र दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सरकारने शेतकर्‍यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.

शेतकर्‍यांना 50 हजारांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

राज्यातील जनतेला सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली आहे.

यासोबतच मुख्यमंत्र्यांनी इतरही घोषणा केल्या. त्यावर एक नजर टाकूयात…

दुर्गम भागातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार 50 टक्के खर्च उचलणार. त्यासाठी 46 कोटींची तरतूद

2010-11 या वर्षात 12 हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे नियोजन

शेतमजुरांना प्रतीदिन किमान वेतन 100 ते 120 रुपये देणार

2012 पर्यंत राज्य भारनियमन मुक्त करणार

पुढील पाच वर्षांत 3 लाख सिंचन विहिरी पूर्ण करणार

राज्यात 1500 मेगापाणलोट क्षेत्र पुढच्या 10 वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य

close