बोथबोडण गावात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

April 30, 2010 2:21 PM0 commentsViews: 108

प्रशांत कोरटकर, यवतमाळ

30 एप्रिल

राज्य सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. आणि या राज्याचा कणा असलेला शेतकरी आणि शेती दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे.

विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील बोथबोडण गावाला सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे गाव म्हणून कलंक लागला आहे.

या गावात 18 शेतकर्‍यांनी कर्जापायी आत्महत्या केल्या आहेत. कर्ता पुरुष गेल्याने ही 18 कुटुंबे सध्या हलाखीत जगत आहेत. सरकारच्या कोणत्याही योजना अजूनही त्यांच्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत.

कृषी क्षेत्रात राज्याची अजूनही पिछेहाटच आहे. एकीकडे राज्य सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना, दुसरीकडे राज्याच्या एका विभागातील हे विदारक चित्र मनाला वेदना देणारे आहे.

सरकारने घेतली दखल

दरम्यान 'आयबीएन-लोकमत'ने दिलेल्या या बातमीनंतर सरकार जागे झाले आहे.

दुग्धविकास मंत्री नितीन राऊत यांनी बोथबोडण गावात जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

आणि या शेतकर्‍यांच्या पत्नींना प्रति महिना 600 रूपये पेन्शन देण्याचे आश्वासन दिले.

close