प्लॉस्टिकच्या वस्तू,पिशव्या वितळवून जवानाने बनवल्या प्लॉस्टिकच्या विटा !

November 8, 2016 6:48 PM0 commentsViews:

आसीफ मुरसल, सांगली 08 नोव्हेंबर : सध्या पर्यावरणात सगळ्यात मोठा अडथळा आहे तो प्लॉस्टिकचा..त्यावर उपाय म्हणून भारतीय सेनादलाच्या एका जवानाने प्लॉस्टिक वितळवून पक्क्या विटा तयार करण्याचा प्रयोग केला आहे. या विटांपासून पक्के रस्ते, फूटपाथ उभारले जाऊ शकतात असा दावा सचिन संदीपान देशमुख या जवानाने केलाय.

sangali_javan4या आहेत प्लाॅस्टिकच्या विटा..प्लॉस्टिकच्या वस्तू, पिशव्या वितळवून या पक्क्या विटा तयार करण्यात आल्यात. सांगली जिल्ह्यातल्या खुजगाव इथले अवलिया सचिन संदिपान देशमुख यांनी या विटा तयार केल्या आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सचिन यांचं शिक्षण 12 पर्यंतचं, 2010 साली तो सैन्यात भरती झाला. सध्या भारतीय सेनादलात नागालँड इथं कार्यरत होते. पण संशोधक वृत्ती गप्प बसू देत नव्हती. प्लॉस्टिकपासून वीट बनवण्याचं त्यांचं संशोधन 2008 पासूनच सुरू होतं. पण फारसं यश येत नव्हतं. मग या प्रयोगाला मदतीसाठी सेनादलातीलच कर्नल ए. सी. कुलकर्णी आणि कर्नल करण धवन यांनी मदत केली आणि त्याने वेस्ट प्लॉस्टिक प्रॉडक्ट’ मशीन तयार केलं.

सचिनचा हा प्रयोग पाहून सांगली महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी त्यांच्या यंत्राद्वारे पालिका हद्दीतील वेस्ट प्लॉस्टिकपासून फुटपाथ आणि आयलँड बनवण्याबाबत सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. देशाचं रक्षण करत असतांनाच प्लॉस्टिकच्या विटा बनवण्याचं सचिनचं संशोधन अत्यंत कौतुकास्पद आहे.

कशा बनवल्या विटा ?
15 बाय 6 इंचाचे ब्लॉक बनवण्यासाठी सुमारे दोन किलो प्लॉस्टिक कचरा लागतो. 150 अंशसेल्सिअसला त्याचे हायड्रोलिक मशीनद्वारे मोल्डिंग केले जाते. मोठ्या प्रमाणावर प्लॉस्टिक एकत्रित झाल्यामुळे या ब्लॉकची मजबुती 20 न्युटॉन इतकी आहे. साध्या मातीच्या विटेची मजबुती 3 न्युटॉन इतकी असते. या ब्लॉकच्या चाचणीसाठी सात टनांचा ट्रक नेऊन पाहिला. त्यातून पेव्हिंग ब्लॉक्स्, फूटपाथ,रस्त्यावरील दुभाजक, रेल्वे रुळावरील स्लीपर्ससाठी उपयोग होऊ शकतो. देशातील प्रमुख 60 शहरांत दररोज 15 हजार टन प्लॉस्टिकचा कचरा तयार होतो.

त्यापैकी 9 हजार टनांचा पुनर्वापर होतो; पण 6 हजार टन कचरा तसाच बाकी राहतो. एका विटेसाठी दहा रुपये खर्च येतो. त्यामुळे शिल्लक दररोज 6 हजार टनप्लॉस्टिकवर प्रक्रिया झाली तर सुमारे 2 हजार 190 कोटींचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

या विटेवर दहा टनांपर्यंत दाब देऊन चाचणी घेतली आहे. जयसिंगपूर येथील जे जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयातून सचिन यांनी या विटानची चाचणी करून घेतली असून, या विटांची स्ट्रेन्थ 24.16 न्यूटन पर एम एम स्केवर इतकी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close