राज्यातल्या आश्रमशाळांवर श्वेतपत्रिका काढा, विखे पाटलांची मागणी

November 8, 2016 7:51 PM0 commentsViews:

vikhe_patil_4308 नोव्हेंबर : राज्यातल्या आश्रमशाळांच्या सद्यस्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीये. राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती अतिशय वाईट आहे. आदिवासी खात्याशी संबंधित अनेक घोटाळे उघडकीस येतायेत. त्यामुळे आश्रमशाळांवर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी विखे पाटील यांनी केलीये. आश्रमशाळांचं ऑडिट करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलीये.अहमदनगरमध्ये ते बोलत होते.

आश्रमशाळांसाठी मोठ्याप्रमाणात निधी खर्च झालाय. अनेक घोटाळे ऐकायला येतायत. त्यामुळे अधिका•यांपासून मंत्र्यांपर्यत दोषी असणा•यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय. पाळमुळं शोधल्या शिवाय समाजाला न्याय मिळणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

अदिवासी समाजाच्या विकासासाठी अश्रमशाळा सुरू केल्या. मात्र मंत्र्यांनी विकासा ऐवजी त्यांची फरफट केली. मात्र सध्याचे आदिवासी मंत्री असंवेदनशील आहेत. त्यांच्या खात्यात मोठा भ्रष्टाचार होतोय. आदिवासी समाजाचं शोषण अधिकारी आणि मंत्र्यांनी केलंय. सावरा यांनी दिवाळीत किती शाळांना भेट दिली, असा सवालही विखे पाटलांनी केलाय. तर मुख्यमंत्री किती दिवस सावरांना सावरणारं असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

बुलढाण्याची घटना वाईट, लाजिरवाणी आहे. त्या शाळेवर कारवाईची धमक मंत्री दाखवणार आहे का, असा सवाल विखेंनी केलाय. अत्याचाराच्या घटनेत मंत्र्यांना बेधडक विधान करताना शरम वाटली पाहिजे. मुख्यमंत्री संवेदनशील असल्यास त्यांनी ताबडतोब मंत्र्यावर कारवाई करावी, असं आवाहनही विखे पाटलांनी केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close