कानडी दडपशाहीचा निषेध प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर

November 8, 2016 8:00 PM0 commentsViews:

CM Cabinet2108 नोव्हेंबर : बेळगावमध्ये मराठी भाषकांवर झालेल्या अन्यायाचा राज्य सरकारनं तीव्र शब्दात निषेध केलाय. कानडी दडपशाहीच्या निषेधाचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. राज्य सरकारचा हा निषेधाचा ठराव कर्नाटक सरकारला पाठवण्यात येणार आहे.

बेळगावमध्ये एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात आलेल्या काळ्या दिनी हजर राहिलेल्या मराठी तरुणांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस कोठडीत त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली होती. मराठी भाषकांना झालेली मारहाण आणि त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी शिवसेनेच्या दिवाकर रावतेंनीही कानडी अत्याचारांचा निषेध केला. बेळगाव, निपाणी आणि कारवार हा भाग सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत केंद्रशासित करावा अशी मागणी शिवसेनेनं केलीये. (संग्रहित छायाचित्र)


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close