अशी असेल 500 आणि 2000 रुपयांची नवी नोट

November 8, 2016 9:52 PM0 commentsViews:

08 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करत 500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे काळा पैशावाल्याचं चांगलंच नाक दाबलं गेलंय. आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द होणार आहे. पण नोटा वापरातून रद्द झाल्या असल्या तरी लवकरच 500 आणि 2000 हजाराच्या नव्या नोटा काढण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शहा यांनी 500 आणि 1000 च्या नव्या नोटा प्रसिद्ध केल्या आहेत. नवी 500 ची नोट ही राखडी रंगाची असणार आहे. आणि या नोटेवर लाल किल्ल्याचा फोटो आहे. तर 2000 हजारांची नोट ही गुलाबी रंगात असणार आहे. या नोटेवर पुढे महात्मा गांधींचा फोटो आहे तर पाठीमागे मंगलयानाचा फोटो आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close