500-1000 च्या नोटा कधीपर्यंत बदलून घेता येईल ?

November 8, 2016 10:24 PM0 commentsViews:

500 note3308 नोव्हेंबर : काळा पैशाच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा केलीये. आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद होणार आहे. पण बँकेत नोटा देऊन बदलण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आलीये. 30 नोव्हेंबरनंतर रिझर्व्ह बँकेत प्रतिज्ञापत्र देऊन नोटा बदलून घेऊ शकतात. 31 डिसेंबरपर्यंतच मुदत देण्यात आलीये.

नोटा कुठे बदलून घेऊ शकता -
30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड दाखवून आपल्या खात्यात जमा करू शकता
30 नोव्हेंबर नंतर रिझर्व बँकेत प्रतिज्ञापत्र देऊन नोटा बदलून घेऊ शकतात
8 नोव्हेंबरपर्यंत विमानतळावर नोटा बदलून घेऊ शकतात
8 नोव्हेंबरपर्यंत स्मशानभूमीवर नोटा बदलून घेऊन शकता
8 नोव्हेंबरपर्यंत हॉस्पिटलमध्येही नोटा बदलून घेता येईल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close