उद्या बँका तर दोन दिवस एटीएम बंद राहणार

November 8, 2016 11:02 PM0 commentsViews:

atm_band08 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे काळा पैशावाल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडालीये. आज मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा वापरातून रद्द होणार आहे. त्यासोबतच दोन दिवस एटीएम मशीन बंद राहणार आहे. काही ठिकाणी एटीएम सुरू राहतील तर काही ठिकाणी एटीएम बंद राहणार आहे.

त्यासोबतच उद्या बँकाही बंद राहणार आहे. जुन्या नोटा जमा झाल्यानंतर त्याची व्यवस्था करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं थोडा वेळ मागितला आहे. त्यामुळे उद्या बँका बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तर एटीएमही बंद ठेवण्यात येणार आहे. 10 नोव्हेंबरलाही काही भागात एटीएम बंद राहणार आहे.

बँका आणि एटीएम जरी बंद राहिले तरी 11 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला बँकेत पैसे जमा करता येणार आहे. तुम्ही जमा केलेल्या पैशातून दिवसाला 4000 रुपये काढण्याची मर्यादा आखण्यात आलीये. त्यासोबतच 11 नोव्हेंबरपर्यंत विमानतळ, हॉस्पिटल, स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी नोटा घेण्यास परवानगी देण्यात आलीये. त्यानंतर मात्र, 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या 500 आणि 1000 च्या नोटा बँकेत जमा करू शकता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close