हुतात्मा स्मारकाला अभिषेक

April 30, 2010 2:46 PM0 commentsViews: 4

30 एप्रिल

उद्या 1 मे. महाराष्ट्र दिन! मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी हुतात्म्यांनी आपले रक्त सांडले.

राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आज मुंबईतील हुतात्मा चौकात एक अनोखा सोहळा रंगला.

हुतात्मा स्मारकाला राज्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याने मंगल अभिषेक घातला गेला.

तसेच प्रत्येक जिल्ह्यातील माती या स्मारकाच्या परिसरात टाकण्यात आली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

close