शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण

November 9, 2016 9:58 AM0 commentsViews:

SENSEX BANNER

09 नोव्हेंबर : देशभरात हजार आणि पाचशेच्या रद्द झालेल्या ₹500 आणि ₹1000 नोटा आणि अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला आहेत. आज बुधवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची तर निफ्टीमध्ये 500 अंकांची घसरण झाली आहे.

मुंबईत शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 1600 अंकांची घसरण झाली असून निफ्टीमध्ये 500 अंकांनी आपटला. सुरुवातीच्या सत्रात ही घसरण झाली असली तरी दिवसअखेरपर्यंत शेअर बाजार वधारेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरांनी मात्र अचानक उसळी घेतली असून सोन्याचे दर प्रतितोळा ४ हजारांनी वाढून ३४ हजारांवर पोहोचले आहेत. तर रुपयावर जास्त फरक पडलेला नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या दरात 23 पैशांनी घसरण झाली आहे.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितरित्या आघाडी घेतल्याने त्याचे परिणाम आशियाच्या शेअर बाजारावरही दिसून आले आहेत.  जपानच्या निक्केईमध्ये २.४ टक्के म्हणजेच २२५ अंकाची तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारातही १.४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, तेलांचे दरही २ टक्क्यांनी घसरले आहेत. भारतीय बाजारपेठेवत त्याचे परिणाम पाहायला मिळणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close