‘यांचा’ कौल ठरला खरा!

November 9, 2016 1:04 PM0 commentsViews:

09 नोव्हेंबर: अवघ्या जगाचं लक्ष अमेरिका निवडणुकीकडे लागलेलं आहे.काल मतदान होऊन आत्ता मतमोजणी चालू असताना डोनल्ड ट्रम्प बऱ्याच आघाडीवर आहेत.जगभरातले तज्ज्ञ, विश्लेषक याबाबत अनेक भाकितं करतायत. पण महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांच्या भविष्यकथनाकडे लक्ष दिलं जातंय.


दक्षिण भारतातल्या ‘चाणक्य ईल’ नावाच्या माशाने डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाचा कौल दिला आहे.एका फिश टॅन्कमध्ये ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन या दोघांचे फोटो असलेल्या  लहान बोटी सोडण्यात आल्या होत्या त्या माश्याने मात्र ट्रम्प यांचाच फोटो असलेली बोट उचलली आणि हे एक-दोन नाही तर चक्क सातवेळा त्याने केलं.

याच आठवड्याच्या सुरुवातीला एका चिनी माकडाने देखील ट्रम्प यांच्याच विजयी होण्याची शक्यता वर्तवली. या माकडाला अशा अंदाजांचा राजा म्हणून ओळखलं जातं. या दोघा उमेदवारांचे कट-आउट्स त्याच्या समोर ठेवले गेले होते.थोडा वेळ ‘विचार’  केल्यानंतर त्यानं ट्रम्प यांचे कट-आउट उचलले आणि त्यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचं भाकीत वर्तवलं .इतकंच नव्हे तर इतर कोणाचीही वाट न पाहता समोरच्या त्या पोस्टरचं अभिनंदनही केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close