मोदींच्या ऐतिहासिक निर्णयाचे पवारांकडून स्वागत

November 9, 2016 2:42 PM0 commentsViews:

Sharad pawar213

09 नोव्हेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केलं आहे.

मोदींनी जेव्हा 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा केली, तेव्हा सोशल मिडीयावरुन पवार यांची खिल्ली उडवली जात होती. मात्र, आज सकाळी पवार यांनी मोदींना ट्विट करुन भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केलं आहे. मोदींच्या या निर्णयामुळे काळ्या पैशाला आळा बसणार आहे. तसंच दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठाही कमी होईल, असंही पवार म्हणालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close