अमेरिकेतून भारतात नोकरीसाठी अप्लाय करणा-यांची संख्या वाढली.

October 18, 2008 1:38 PM0 commentsViews: 3

दिनांक 18 ऑक्टोबर- अमेरिकेत मंदीच्या संकटानं तिथल्या जॉब मार्केटलाही हलवून सोडलं आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांची संख्या कमी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अमेरिकेतून भारतातल्या कंपन्याकडे नोकरीसाठी अप्लाय करणा-यांची संख्या वाढलीय. पण जाणकारांच्या मते इतक्या जणांना भारतात नोकरी मिळणं सोपं नाही. भारतीय जॉब पोर्टल्सकडे हल्ली अमेरिका आणि युरोपमधून शेकडो बायोडेटा येत आहेत. अमेरिकेतल्या मंदीमुळे तिथल्या अनेक भारतीयांच्या नोक-या गेल्या आहेत. हताश झालेल्या या भारतीय तरुणांनी पुन्हा मायदेशाकडे मोर्चा वळवला आहे. ह्युमन रिसोर्सेसमधल्या काही तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे मागील सहा महिन्यात परदेशातील नोक-यांसाठी अर्ज येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे भारतात परत येऊ इच्छिणा•या फायनान्शिअल सेक्टरमधल्या एकशे पंचवीस प्रोफेशनल्सची एमा पार्टनर्स या कंपनीनं एक लिस्ट बनवली आहे. यातले बहुतेक लेहमन, मॉर्गन स्टॅनले आणि मेरिल लिंचमध्ये कर्मचारी आहेत. पण प्रोफेशनल्स असोत वा फ्रेशर्स भारतीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळणं सोपं नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. नोक-यांची चणचण फक्त फायनान्शिअल सेक्टरमध्येच नाही तर ऑटो आणि एव्हिएशन सेक्टरमध्येही आहे. पण भारतात परतणा-या फक्त दहा ते पंधरा टक्के लोकांनाच इथं नोकरी मिळू शकेल आणि त्याही मध्यम दर्जाच्या कंपन्या असतील. त्यामुळे भारतात नोकरीसाठी परत येणा-या या एनआरआयजमुळे भारतातल्या फ्रेशर्सच्या नोकरीच्या संधी कमी होतील.

close