डोन्ट वरी, राज्यासह देशातील सर्व टोलनाके 11 नोव्हेंबरपर्यंत बंद

November 9, 2016 5:13 PM0 commentsViews:

mumbai vashi toll09 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा वापारातून रद्द झाल्यामुळे सर्वसामान्यांची दैनदिन जिवनात चांगलीच दमछाक होत आहे. टोल नाक्यांवर तर सुट्टे पैसे नसल्यामुळे वाहतूक कोंडी पाहण्यास मिळालीये. पण आता चिंता करायचे काम नाही 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाके बंद राहणार आहे अशी महत्त्वाची घोषणा दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलीये. तसंच राज्यातीलही टोल नाके बंद राहणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याची घोषणा करून अर्थव्यवस्थेत एकच भूकंप घडवला. काल रात्रीपासून नोटा चलनातून बाद झाल्या आहे. अपेक्षेप्रमाणे आज सकाळी दैनदिन जिवनात सर्व सामान्यांनी सुट्टे पैसे करण्यासाठी ठिकठिकाणी एकच झुंबड उडाली. विशेष म्हणजे टोलनाक्यांवर रोजचा व्यवहार यामुळे अडचणीत सापडला. सुट्टे पैसे नसल्यामुळे टोलनाक्यांवर मोठी कोंडी झाली. त्यामुळे आता नितीन गडकरी यांनी दोन दिवस सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. 11 नोव्हेंबरपर्यंत देशभरातले टोलनाके बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके बंद राहणार आहे , टोलनाक्यांवर पैसे घेतले जाणार नाहीये. वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय अशी माहिती गडकरींनी दिलीये. गडकरींच्या निर्णयापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टोल नाके 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे अशी घोषणा केलीये.

नितीन गडकरींचं टिवट्
’11 नोव्हेंबरपर्यंत देशभरातले सर्व राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय’.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close