देवालाही 500 आणि 1000 च्या नोटांचं वावडं !

November 9, 2016 6:03 PM0 commentsViews:

sidhivinayak)mandir09 नोव्हेबर : 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे सर्वत्र सर्वांना एकच धक्का बसलाय. आज सकाळपासून 500 – 1000 च्या सुट्‌ट्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. पण, दुसरीकडे देवालाही बंदी घातलेल्या नोटांचं वावडं दिसून आलं. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आता 500 आणि 1000 च्या नोटांना बंदी घालण्यात आलीये.

भक्तांच्या नवसाला पावणा-या सिद्धीविनायक मंदिराच्या दरबारात सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची हजेरी असते. दररोज लाखो रुपयांचं सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना एकच धक्का दिला. काल मध्यरात्रीपासून नोटा बंद झाल्या आहे. त्याचे परिणाम सर्वसामान्यांना दैनदिन जिवनावर उमटले आहे. ठिकठिकाणी व्यापारी, दुकानांवर 500 आणि 1000 च्या नोटा घेत नाहीये. सिद्धीविनायक मंदिरातही 500 आणि 1000 च्या नोटा घेण्यास आता मनाई करण्यात आलीये.

अभिषेक आणि प्रसादासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येत नव्हत्या. मात्र दानपेटीत पाचशे हजारांच्या नोटा टाकू शकता अशी विनंतीच सिद्धीविनायक ट्रस्टने केलीये. तर पंढरपुरातील कार्तिक वारीतील वारक•यांच्या व्यवहारांनाही फटका याचा फटका बसलाय. तरदुसरीकडे शिर्डी संस्थानकडून साईभक्तांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था कऱण्यात आलीे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close