विदर्भात काळा दिवस

May 1, 2010 10:50 AM0 commentsViews: 2

1 मे

राज्यभरात आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना विदर्भ राज्य संग्राम समितीने आज काळा दिवस पाळला. विदर्भात ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून आंदोलने करण्यात आला.

संग्राम समितीच्या नेत्यांनी नागपुरात सीता बर्डी भागात गांधी चौकात निदर्शने केली.

अमरावतीतही काळा दिवस पाळला. याच दिवशी नागपूर करारांतर्गत विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला होता. मात्र या कराराची अंमलबजावणी झाली नसल्याचे सांगत विदर्भवाद्यांनी आज हे आंदोलन केले.

अमरावतीत ध्वजारोहणाच्या शासकीय कार्यक्रमात आमदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवण्यात आले.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या घोषणा दिल्या गेल्या. या वेळी 300 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

close