ट्रम्प यांच्यासोबत ‘या’ भारतीय वंशाच्या महिलेनं रचला इतिहास

November 9, 2016 6:18 PM0 commentsViews:

Kamala_Haris_GE_091116

09 नोव्हेंबर: कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेची निवड अमेरिकन सिनेटसाठी झालीय. भारतीय वंशाची पहिली महिला अमेरिकन सिनेटवर आल्यानं एक इतिहासच रचला गेलाय.कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियामध्ये आपले प्रतिस्पर्धी डेमोक्रेट पक्षाचे लॉरेटा सांचेज यांचा पराभव केला.

ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पिपल ऑफ इंडियन ओरिजनचे अध्यक्ष थॉमस अब्राहम म्हणाले की, कमला हॅरिसच्या विजयानं अमेरिकेतल्या भारतीयांना आणखी एक संधी उपलब्ध झालीय. यामुळे अमेरिका आणि भारत व्यापार, उद्योग, विज्ञान, सैन्याची मदत आणि दहशतवादाशी मुकाबला याबाबत एकमेकांशी सहयोग करू शकतील.

52 वर्षांच्या कमला हॅरिस मूळच्या चेन्नईच्या आहेत. त्या वकील आहेत. 2010 आणि 2014मध्ये त्या ऍटर्नी जनरल झाल्या होत्या.
सिनेटमध्ये निवडून येणार्‍या त्या सहाव्या कृष्णवर्णीय आहेत.पाचवे कृष्णवर्णीय बराक ओबामा होते.

कमला हॅरिस यांच्या आईचं-श्यामला गोपालन यांचं शिक्षण चेन्नई इथे झालं.त्यांचे वडील जमेकामध्ये होते.कमला यांचा जन्म कॅलिफोर्निया इथे झाला.दोन वेळा ऍटर्नी जनरल असलेल्या कमला हॅरिसनं आपल्याच पक्षाच्या लॉरेटांना या निवडणुकीत हरवलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close