येत्या शनिवारी-रविवारीही बँका सुरू राहणार

November 9, 2016 6:35 PM0 commentsViews:

bank_open09 नोव्हेंबर : 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता लोकांना आपल्याकडील असलेल्या नोटा बँकेत भरावे लागणार आहे. त्यासाठी आता शनिवारी आणि रविवारीही बँका सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सुट्टीच्या दिवशीही बँकेत पैसे भरू शकणार आहात.

500-1000 नोटा आता बाजारातून हद्दपार झाल्या आहे. आता या नोटांना जिवनदान देण्यासाठी तुम्हाला बँक गाठावी लागणार आहे. आज बँकांना सुट्टी देण्यात आलीये. आता उद्या जेव्हा बँका सुरू होती तेव्हा बँकामध्ये गर्दी होण्याची चिन्ह आहे. त्यामुळेच बँकामध्ये गर्दी होऊ नये म्हणून येत्या रविवारी 13 नोव्हेंबर आणि शनिवारी 12 नोव्हेंबरला बँका पूर्ण दिवस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तशा सुचना बँकांना देण्यात आल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close