…आणि कचराकुंडीत सापडलं 500-1000 च्या नोटांनी भरलेलं पोतं !

November 9, 2016 8:49 PM0 commentsViews:

note_pota309 नोव्हेंबर : पोतंभरं पैसे सापडले असं जरी कुणी सांगितलं तर त्यात किती रोकड असेल असा प्रश्न साहजिकच मनात येतो. पण, आता 500 आणि 1000 च्या नोटा रद्द झाल्यामुळे चक्क 500 आणि 1000 रुपयांनी भरलेलं पोतं कचराकुंडीजवळ सापडलंय. सोशलमीडियावर या पोतंभरं पैशाचा फोटो व्हायरल झालाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळापैशावाल्यांचं कंबरडं मोडण्यासाठी 500 आणि 1000 रुपयांच्या वापरातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे पेट्रोलचे दर ज्याप्रमाणे मध्यरात्री लागू होता त्याप्रमाणे काल मध्यरात्री या नोटा रद्द झाल्यात. त्यामुळे नेहमी दरवाढीची सवय असणा•या सर्वसामान्यांना चक्क नोटाचं बंद झाल्याचा झटका बसला. ठिकठिकाणी आता 500 आणि 1000 च्या नोटा सुट्टे करण्याची धडपड सुरू आहे. याच गोंधळात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. एका कचरा कुंडीत कुणीतरी पैशांनी भरलेलं पोत ठेवलं. या पोत्यात चक्क 500 आणि 1000 च्या नोटा आहेत.

पण, नेमका हा फोटो कुठला आहे. हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहेच. खरंतर काळ्यापैशावाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. घरात दडवून ठेवलेला पैसा बँकेत कसा भरायचा या प्रश्नाने त्यांची झोप उडालीये. त्यातूनच हे कुणाचे कृत्य असावे असं समजायला सर्वसामान्यांना इशाराच पुरेसा आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close