‘अमेरिकेने निवडला मुस्लीमविरोधी राष्ट्राध्यक्ष’,मध्य-पूर्व आशियाची संतप्त प्रतिक्रिया

November 9, 2016 10:35 PM0 commentsViews:

 donald trump409 नोव्हेंबर : अमेरिकन जनतेने एक महिला राष्ट्राध्यक्ष निवडण्यापेक्षा मुस्लीमधर्मियांना विरोध करणारा राष्ट्राध्यक्ष निवडलाय, अशी प्रतिक्रिया मध्य-पूर्व आशियामध्ये उमटलीय.

अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर जगभरातच मुस्लिमविरोधी वातावरण तयार झालं. पॅरिस आणि ब्रसेल्स हल्ल्यानंतर पाश्चिमात्य जगात पुन्हा एकदा मुस्लिमविरोधी भावना तीव्र होत्या. याचाच फायदा घेत डॉनल्ड ट्रम्प यांनी विखारी प्रचार केला. आता ट्रम्प यांच्या विजयानंतर पुन्हा एकदा जगभरात हेच वातावरण राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकेमध्ये मुस्लीमधमिर्यांना येऊ दिलं तर 9/11 सारखे आणखी हल्ले होतील, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. अमेरिकन मतदारांमधल्या याच असुरक्षिततेच्या भावनेचा फायदा त्यांनी घेतला. डॉनल्ड ट्रम्प यांच्या प्रचारामुळे जास्तीत जास्त अमेरिकन नागरिकांनी मतदानासाठी नोंदणी केली आणि ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला.

डॉनल्ड ट्रम्प यांनी प्रचारात स्थलांतरितांचा मुद्दाही लावून धरला. मेक्सिको आणि अमेरिका यांच्यात भिंत बांधा, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ माजवली. अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांमुळे मूळ अमेरिकन नागरिक बेकार झालेत, त्यांना नोकरीच्या संधी गमवाव्या लागतायत हे ट्रम्प यांनी मतदारांच्या मनावर ठसवलं. त्यामुळेच हिलरी आणि ट्रम्प या दोन उमेदवारांमध्ये मतदारांनी डॉनल्ड ट्रम्प यांची निवड केली.

डॉनल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेच्या विकासासाठीचं निश्चित धोरण नाही. त्यातच प्रचारात मांडलेले मुद्दे ट्रम्प यांनी तसेच रेटले तर अमेरिकेवर आणि पूर्ण जगावरच त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close