नोटा बदलण्यासाठी लोकांच्या बॅंकाबाहेर रांगा

November 10, 2016 8:40 AM0 commentsViews:

BANK RUSH

 10 नोव्हेंबर : पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी लोकांनी आज सकाळपासूनच बॅंकाबाहेर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्व नागरिकांना नोटा बदलून मिळतील त्यामुळे लोकांनी विनाकारण कोणताही गोंधळ करू नये, असं आवाहन बॅंकेकडून करण्यात आले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर काल बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज नोटा बदलण्यासाठी तसेच पैसे जमा करण्यासाठी बँका आणि पोस्ट ऑफिसबाहेर सकाळपासून गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांना नोटा बदलून देण्यासाठी बॅंकाही सज्ज झाल्या असून आजपासून बॅंकामधून लोकांना नोटा बदलून मिळणार आहेत. तर लोकांची गैरसोय होऊ नये आणि आर्थिक व्यवहार करण्याची टंचाई भासू नये म्हणून येत्या शनिवारी आणि रविवारी बॅंका सुरू ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, नोटा बदलून देताना यावेळी नागरिकांना सुट्टे (चिल्लर) पैसे देण्याचाही बॅंकाचा विचार असल्याचे बॅंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वांना नोटा बदलून मिळाव्यात हा त्यामागचा हेतू असल्याचे एका बॅंक अधिकाऱ्याने सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close