TCSच्या अध्यक्षपदावरूनही मिस्त्रींची उचलबांगडी, इशात हुसेन अंतरिम अध्यक्ष

November 10, 2016 11:33 AM0 commentsViews:

518151-tcs

10 नोव्हेंबर :  टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांना आणखी एक झटका देत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)च्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावरूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अंतरिम अध्यक्ष म्हणून इशात हुसेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीसीएसने तसं मुंबई शेअर बाजारालाही कळवलं आहे.

इशांत हुसेन हे लगेचच सूत्रे हाती घेणार असून नव्या अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत टीसीएसच्या अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळणार असल्याचं टाटा सन्सने स्पष्ट केलं आहे.

टाटा समूहाच्या टाटा सन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, व्होल्टास आणि टाटा स्काय अशा विविध कंपन्यांच्या संचालक मंडळांवर इशात हुसेन यशस्वीपणे जबाबदारी सांभाळत आहेत. टाटा स्टीलचे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close