आता नवी ‘एक हजाराची नोट’!

November 10, 2016 1:28 PM0 commentsViews:

486192-rupee-1000

10 नोव्हेंबर :   केंद्र सरकारने बंद केलेली 1000 रुपयाची नोट नव्या स्वरुपात लवकरच येणार आहे. सुरक्षेची नवी वैशिष्ट्य समाविष्ट करून 1000 रुपयाची ही नोट पुढच्या काही महिन्यात चलनात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. फक्त हजार रुपयांचीच नव्हे तर येत्या काळात सर्वच नोटांचे स्वरुप बदलण्यात येणार असल्याचंही दास यांनी स्पष्ट केलं.

हजार रुपयांची नवी नोट नव्या रंगात आणि नव्या डिजाइनमध्ये येणार आहे. या नोटेचे स्वरुप पूर्णपणे वेगळे असणार आहे. काळा पैसा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्वच नोटांचे स्वरुप बदलले जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close