तडे गेल्यानं लालबाग फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद

November 10, 2016 2:27 PM0 commentsViews:

Lalbaug flyover

10 नोव्हेंबर :  मुंबईतील लालबाग फ्लायओव्हर वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आला आहे. फ्लायओव्हरच्या रस्त्यात मोठा तडा गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी लगेचच बंद करण्यात आला. तर लालबाग पूल भायखळा दिशेच्या वाहतुकिसाठी खुला केला गेला.

2011 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. तसंच नुकतंच या रस्त्याचंरस दुरुस्तीचं कामही पूर्ण झालं होतं. पाच वर्षांपूर्वीच सुरू झालेल्या या पुलाला तडे जाणं आणि रसत्यांच्या दुरुस्तीचे काम होऊनही लगेचच पुन्हा अशी स्थिती उद्भवल्यामुळे या पूलाच्या बांधकामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोणताही गंभीर प्रकार घडू नये म्हणून तडा गेलेल्या पूलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र सकाळी या पुलाच्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा यामुळे खोळंबा झाला आहे. आज दिवसभरात दुरुस्तीचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. पण अजून तिथे कोणतीही अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिसत नाहीय. संध्याकाळी 6 नंतर दक्षिण मुंबईहून दादरकडे जाणारी वाहतूक वाढते. जर हा पूल आज दुरुस्त नाही झाला, तर परळ-लालबाग भागात प्रचंड वाहतूक कोंडी होणार हे नक्की. यामुळे आता प्रशासनाकडून याबाबतीत काय भूमिका घेतली जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close