नोटबदलीच्या अडचणीमुळे मनमाडच्या शेख परिवारातील लग्नकार्यातही मोठं विघ्न

November 10, 2016 3:32 PM0 commentsViews:

10 नोव्हेंबर:  पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी रात्री 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याचं जाहीर केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं. नोटा बंदचा फटका मनमाड मध्ये एका लग्नाला बसला असून मुलीच्या लग्नासाठी बँकेतून काढलेले 30 हजार रुपये खर्च करता येत नसल्यामुळे वधुपिता अडचणीत सापडला आहे.

Manmad231

मनमाड इथल्या गयकवाड चौकात राहत असलेले वजीर शेख यांच्या मोठ्या मुलीचे आज लग्न आहे. लग्नासाठी त्यांनी बँकेत पैसे जमा केले होते. मुलीचा लग्न दोन दिवसावर आल्याने त्यांनी बँकेतून मंगळवारी दुपारी 50 हजार रुपये काढले . बँकेने त्यांना 500 आणि 1000 च्या नोटा दिल्या होत्या. त्यातून त्यांनी दुपारी काही रुपये खर्चही केले होते. तर उरलेले पैसे मांडव ,आचरी आणि इतर खर्चासाठी राखून ठेवले होते. परंतु मंगळवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्याची घोषणा केली. मोदींच्या या घोषणांचा फटका शेख यांना ही बसला. त्यांनी सामान आणण्यासाठी दुकानदारांना 500 आणि 1000 च्या नोटा दिले असता त्यांनी ते घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झाला असून त्यांच्या मुलीच्या लग्नात विघ्न निर्णमान झालं आहे.

अखेर आज लग्न असल्याने या परिसरातील जेष्ठ नागरिकांनी त्यांना उधारीत आवश्यक असलेल्या वस्तु खरेदी करून मदत केली. विशेष म्हणजे वधूपित्याचीच अडचण झालीय असं नाही तर अहेर कसा द्यावा, हे लग्नाला आलेल्या पाहुण्यांना कळत नाहीय. आता 500 हजार रुपये अहेर करायचा तर तेवढ्या नोटा कुणाकडेच नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close